RSS पुरवते इंडियन मुजाहिदीनला निधी- वाघेला, RSS provides funding to IM- Waghela

RSS पुरवते इंडियन मुजाहिदीनला निधी- वाघेला

RSS पुरवते इंडियन मुजाहिदीनला निधी- वाघेला
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

काँग्रेस नेते शंकरससिंग वाघेला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर इंडियन मुजाहिदीनला निधी पुरवत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. गुजरातमधील विरोधी पक्षनेते वाघेला यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘रा.स्व.सं’च इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला निधी पुरवत असल्याचा आरोप केला.

यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस इंडियन मुजाहिदीनकडे काना डोळा करत असल्याची टीका काँग्रेसवर केली होती. आता त्यावर प्रतिक्रिया देताना शंकरसिंग वाघेला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच इंडियन मुजाहिदीनला निधी पुरवत असल्याचं म्हटलं आहे. इंडियन मुजाहिदीन आणि भाजपची कार्यशैली एकाच प्रकारची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कालियानी या समाजाच्या माध्यमातून इंडियन मुजाहिदीनला पैसे पुरवल्याचा दावा वाघेला यांनी केला.

इंडियन मुजाहिदीन ही मुस्लिमांनी सुरू केलेली संघटना असली, तरी भारतीय मुस्लिमांनी या दहशतवादी संघटनेला कधीच प्रतिसाद दिला नाही. याच गोष्टीचा फायदा घेत भाजप आणि रा.स्व.सं.ने इंडियन मुजाहिदीनला निधी पुरवला आणि दहशतवादी कारवाया करवल्या. असा आरोप शंकरसिंग वाघेला यांनी म्हटलं आहे. बिहारमधील बॉम्बस्फोटांमागील गुजरात भाजपचा हात असल्याचं सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांनी कसून शोध घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 16:33


comments powered by Disqus