Last Updated: Thursday, August 1, 2013, 20:26
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीराजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली आहे. यासाठी RTI कायद्यात दुरूस्ती विधेयकाला मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली.
त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक येण्याची शक्यता आहे. जूनमध्ये केंद्रीय माहिती आयुक्तांनी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, माकपा आणि भाकपा हे ६ राष्ट्रीय पक्ष RTI कायद्याच्या कक्षेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. हे पक्ष अनेक सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचा आधार आयुक्तांनी घेतला होता.
त्यामुळेच RTI कायद्यात बदल करण्याची खटपट केंद्र सरकारनं चालवली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 1, 2013, 20:26