भाजपच्या `ड्रीम प्रोजेक्ट`ची दौड; `रन फॉर युनिटी` , run for unity, organised by BJP

भाजपच्या `ड्रीम प्रोजेक्ट`ची दौड; `रन फॉर युनिटी`

भाजपच्या `ड्रीम प्रोजेक्ट`ची दौड; `रन फॉर युनिटी`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त एकतेचा संदेश देणारी ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ही मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आलीय. बडोद्यामध्ये या दौंडला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला.

देशभरात या दौडसाठी ४० लाख नागरिक धावणार असल्याचं मोदींनी म्हटलं. सरदार पटेल यांनी देश जोडण्याचं काम केलं. त्यामुळं लोकसहभागातून महाशक्ती बनणार असल्याची गर्जना मोदींनी केली. नरेंद्र मोदी यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’साठी ही रन आयोजित केल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

मुंबईतही आज सकाळी साडेसात वाजता ही दौड सुरू झालीय. ऑगस्ट क्रांती मैदान ते वरळीतल्या एनसीआय सरदार वल्लभभाई पटेल स्मारकापर्यंत ही दौड होणार आहे.


पाहा... यावेळी मोदी काय म्हणाले...





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 15, 2013, 09:50


comments powered by Disqus