रूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला, Rupee hits an all-time low of 64 against US dollar, investors worried

रूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला

रूपयाबरोबरच शेअर बाजार कोसळला
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण झाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. शेअर मार्केट कोसळले आहे. सेंसेक्स सुरूवातीला ९८ पैशांनी घसरला. तर रूपयाचे मूल्य ६४ वर पोहोचलेय.

रूपया रोज निचाकांचे नवनवे विक्रम प्रस्थापित करतोय. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ४३.१६ पर्य़ंत खाली घसरलीय. सोमवारची १४८ पैशांची घसरण ही गेल्या १० वर्षांतली सर्वात मोठी घसरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मागणी वाढल्यानं त्याचा फटका रूपयाला बसला. काही केल्या रूपयाची घरसण थांबायला तयार नाही. शुक्रवारी डॉलरची किंमत ६२ पर्यंत खाली गेली होती.

बाजार बंद होताना रूपयानं थोडीची उचल खात ६१.६५ पर्यंत वर आला होता. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रूपयानं नवा निचांक प्रस्थापित करत थेट त्रेसष्टीच गाठली. बँका आणि आयातदारांकडून वाढलेली डॉलरची मागणी आणि परदेशी म्युच्युअल फंडांचा निधी बाहेर जात असल्याचा दुहेरी फटका रुपयाला बसतोय.

रुपयाच्या घसरणीचा शेअर बाजारावरही परिणाम झालाय. शुक्रवारी ८०० अंशांनी गडगडलेला मुंबई शेअर बाजार आजही तब्बल २९० अंशांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही ९३अंशांची घसरण झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 20, 2013, 13:13


comments powered by Disqus