दिल्लीत परदेशी युवतीवर गँगरेप, ४ अटकेत, Rwandan woman gang-raped near DU

दिल्लीत परदेशी युवतीवर गँगरेप, ४ अटकेत

दिल्लीत परदेशी युवतीवर गँगरेप, ४ अटकेत
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीतील तिमारपूर पोलिस ठाण्याच्या कक्षेत एका परदेशी युवतीवर गॅंगरेप झाल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पीडित युवती ही आफ्रिकन देशातील असून, ती रवांडाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

गॅंगरेप करणारे सर्व आरोपी उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. पीडित युवतीने 5 डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. संबंधित युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रवीण, आलोक, विकास आणि दीपक नावाच्या तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. हे चारही तरुण उच्चशिक्षित असून, दिल्लीतील नेहरू विहार भागात राहतात व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे युवतीने म्हटले आहे.

युवतीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी प्रथम तिच्याबरोबर मैत्री वाढवली व जवळीक साधून हे कुकर्म केले. युवकांनी तिला पार्टी असल्याचे सांगून घरी बोलावले आणि तिथे त्यांनी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर गॅंगरेप केला. युवतीने तक्रार केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली असून चौघांना अटक केली आहे.

First Published: Friday, December 7, 2012, 16:55


comments powered by Disqus