सचिन तेंडुलकर करणार काँग्रेसचा प्रचार?, Sachin Tendulkar to campaign for Congress in Madhya Pradesh

सचिन तेंडुलकर करणार काँग्रेसचा प्रचार?

सचिन तेंडुलकर करणार काँग्रेसचा प्रचार?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे वृत्त मध्य प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहे. दरम्यान, सचिनकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसकडून सचिनला मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे. याबाबत माहिती काँग्रसतर्फे प्रवक्ते प्रमोद गुगालिया यांनी दिली. सचिन तीन दिवस प्रचार करील, असे त्यांनी सांगितले.

सचिन २०० कसोटी क्रिकेट सामने खेळल्यानंतर निवृत्ती घेणार आहे. त्यासाठी सचिनच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे. १९९ वा सामना कोलकातामध्ये तर २०० कसोटी सामना सचिनच्या विनंतीनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. त्याची तयारी जोरदार सुरू आहे. असे असताना काँग्रेसकडून सचिन प्रचार करील, असे वृत्त धडकल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, October 26, 2013, 14:42


comments powered by Disqus