Last Updated: Friday, February 28, 2014, 21:14
www.24taas.com, झी मीडिया, लखनौसहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना चार मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौत एका न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केल्यानंतर सुब्रतो रॉय यांना अटक करण्यात आलीय.
शुक्रवारी सुब्रतो रॉय यांना कोर्टात हजर करण्यात आलं. सुब्रतो रॉय यांना कोर्टाने विचारलं, तुम्हाला काही बोलायचं आहे का?, यावर सुब्रतो रॉय यांनी उत्तर दिलं, मी कायद्याचा सन्मान करतो, त्यासाठी मी सदैव तयार असतो.
तरीही तुम्हाला काही बोलायचं आहे का, असं न्यायाधीशांनी पुन्हा विचारल्यावर, त्यांनी नाही असं उत्तर दिल्याचं वकिलांनी सांगितलंय.
सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी शुक्रवारी पोलिसांना समर्पण केलं होतं. मात्र बराच वेळ आपल्या लखनौमधील सहारा शहरमध्ये थांबून, ते न्यायालयाकडे रवाना झाले.
नेमकं प्रकरण काय आहे?हे प्रकरण गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रूपयांचा परतावा न दिल्याशी संबंधित आहे.
सुप्रीम कोर्टाने याआधी केलेल्या सुनावणीत, गुतंवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सेबीला सहारा ग्रुपच्या संपत्तीच्या विक्रीची परवानगी देण्यात आली होती.
केएस राधाकृष्णन आणि जेएस खेहर यांच्या खंडपीठाने सेबीला मागील सुनावणीत, गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रूपए परत करता यावेत, म्हणून सहारा ग्रृपच्या प्रॉपर्टीचा काही भाग विकण्याची सूचना दिली होती.
सहारा समूहाकडे गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रूपये बाकी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट 2012 रोजी दिलेल्या निर्णयात पैशांच्या वसुलीसाठी सेबीला सहारा ग्रृपच्या संपत्तीच्या काही भागाच्या विक्रीचे आदेश दिले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 28, 2014, 19:50