Last Updated: Tuesday, January 14, 2014, 16:44
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबादनरेंद्र मोदी यांच्या नशिबात जे असेल ते त्यांना मिळो, असं सलमान खानने म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी सलमानची इच्छा आहे का?, या प्रश्नाला सलमान खानने अशी व्यवस्थित बगल दिली.
सलमान खानने नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदावर बोलणं टाळलं आहे. यावेळी सलमानने राजकीय प्रश्नांची उत्तर पतंगबाजीने दिली आहेत.
अहमदाबादेतील पतंगोत्सवात सलमान खान सामिल झाला होता. यावेळी त्याने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. मात्र कोणतंही वादग्रस्त विधान करणं टाळलं.
नरेंद्र मोदी यांना मतदान करावं, असं आवाहन तू लोकांना करशील का?, यावर सलमान म्हणाला, प्रत्येकाला त्या भागातील लोकं प्रिय असतात, आता मी मुंबईतील बांद्र्यात राहतो, मी मुंबईत प्रिया दत्त आणि बाबा सिद्दिकी यांना मतदान करणार आहे. तसेच सर्वांचे आहे. तुमचा विकास करणारा तुम्हाला निश्चितच जवळचा वाटतो. तुम्हाला वाटत असेल त्याला नक्की मतदान करा.
यानंतर सलमानला तिसरा प्रश्न विचारण्यात आला, यावरही सलमान खानने विचारपूर्वक उत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार का?, यावर सलमान खानने सांगितलं, मी जय हो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादेत आलो आहे. मला माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनला वेळ नाही, तर मी प्रचाराला वेळ कसा देऊ?, असा प्रतिप्रश्न सलमानने करून हा प्रश्न संपवला.
नरेंद्र मोदी हे गुडमॅन आहेत, त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला राजकारणातलं फारसं कळत नाही, अस सांगून सलमान खानने नरेंद्र मोदी यांच्या नशिबावर सर्वकाही सोडून दिलं आहे.
अहमदाबादेतील पतंगोत्सवात सलमान खान सामिल झाला होता. यावेळी त्याने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. जय हो चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमान खान पतंगमहोत्सवात दाखल झाला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 16:03