Last Updated: Monday, March 18, 2013, 09:45
www.24taas.com,लखनऊधावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणा-या उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आलीये. चंद्रनाथ सिंह असं या नेत्याचं नाव आहे.
प्रतापगढचा माजी खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्याची उमेदवारीही समाजवादी पार्टीकडून जाहीर करण्यात आलीये. दिल्लीला जाणा-या पद्मावत एक्स्प्रेसमध्ये त्यांनं तरुणीची छेड काढली.
चंद्रनाथ सिंह त्यावेळी दारुच्या नशेत असल्याचं सांगण्यात येतयं. तरुणीच्या तक्रारीवरुन शहाजहापूरच्या जीआरपीनी चंद्रनाथला अटक केलीये.
First Published: Monday, March 18, 2013, 09:15