महापालिकेला जेव्हा 'झोप' येते!, sambhaji maharaj photo instead of shivaji maharaj

महापालिकेला जेव्हा 'झोप' येते!

महापालिकेला जेव्हा 'झोप' येते!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे महापालिकेत आज एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडलाय. शिवजयंती साजरी करणाऱ्या महापालिकेनं उत्सवादरम्यान शिवाजी महाराजांऐवजी चक्क संभाजी महाराजांचाच फोटो लावला.

पुण्यात डेक्कनला असलेल्या संभाजी महाराजांच्या प्रसिद्ध पुतळ्याचा फोटो पुण्यात शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचा फोटो म्हणून वापरण्यात आला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थानं आहेत. प्राथमिक वर्गापासून प्रत्येकानं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासलाय.

मात्र, सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे महापालिकेला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमधला  साधा फरकही समजू नये यापेक्षा दुर्देवी बाब नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 19, 2014, 19:05


comments powered by Disqus