आरक्षणाची ‘बढती’ आज राज्यसभेत, SC/ST job promotions quota bill in Parliament

‘आरक्षणाची बढती’ आज राज्यसभेत

‘आरक्षणाची बढती’ आज राज्यसभेत
www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारी नोक-यांमध्ये बढती देतांना ‘एससी’ आणि ‘एसटी’ना आरक्षण देण्यास केंद्रानं मंजुरी दिलीय. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. मात्र संसदेचं पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपत असल्यानं हे विधेयक या अधिवेशनात संमत होण्याची शक्यता कमीच आहे.

बढतीत आरक्षण देण्याचा निर्णय २१ ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता. या विधेयकाला समाजवादी पक्षानं विरोध केलाय. दुसरीकडे भाजपने या विधेयकाला पाठिंबा द्यावा असं आवाहन बसप नेत्या मायावती यांनी केलं. या विधेयकामुळे सरकारी नोकरीत यापुढे बढतीसाठीही आरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, या विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे.

First Published: Wednesday, September 5, 2012, 11:12


comments powered by Disqus