Last Updated: Wednesday, February 13, 2013, 23:10
www.24taas.com, मुंबई वारेमाप प्रलोभने देऊन नंतर गुंतवणुकदारांना `बेसहारा` करणाऱ्या सहाराच्या सुब्रतो रॉय यांना धक्का बसला आहे. सेबीनं बुधवारी केलेल्या कारवाईत करोडो गुंतवणुकदारांना बेसहारा करणाऱ्या सहारा समुहाचे 100 पेक्षा अधिक खाती गोठावाली आहेत.
सुब्रोतो राय यांचे खातीही सेबीनं सील केली आहेत. सहारा समुहातील सहारा हाऊसिंग आणि सहारा रियल इस्टेटमधील गुंतवणुकदारांनी सेबीकडं तक्रार केली होती. आपण गुंतवलेला पैसा नियोजीत वेळेत परत न आल्याची तक्रार गुंतवणुकदारांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयने सहाराला गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी रुपये त्यावरील 15 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतरही सहारा समुहाची टाळाटाळ सुरु होती.
त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने 5 फेब्रुवारी रोजी सहाराची खाती गोठावण्याचे आदेश सेबीला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच सेबीने ही कारवाई केली.
First Published: Wednesday, February 13, 2013, 23:10