गाझियाबादमध्ये बेहिशेबी साडेसहा कोटी रूपये जप्त seized 6 crore by police

गाझियाबादमध्ये बेहिशेबी साडेसहा कोटी रूपये जप्त

गाझियाबादमध्ये बेहिशेबी साडेसहा कोटी रूपये जप्त
www.24taas.com,झी मीडिया, गाझियाबाद

गाझियाबाद शहरात सुमारे साडेसहा कोटी रुपयांची बेहिशेबी कॅश ४ वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आली.

पोलिस अधीक्षक शिवहरी मीना यांनी सांगितले की, बेहिशेबी पैशांच्या उधळणीवर रोख लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान ही रोकड जप्त करण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वापरण्यासाठी नेण्यात येत असल्याचा संशय आहे.

आधी जप्त करण्यात आलेली ही रक्कम चार कोटी रुपये असावी असा अंदाज होता, मात्र ती एकूण साडेसहा कोटी रुपये असल्याचे आढळू आले आहे. राहिलेले दोन कोटी रुपये संबंधित व्हॅनच्या मागच्या भागात सापडले.

संबंधित व्हॅनच्या चालकाला या रकमेबद्दल काहीही माहिती देता आली नाही, तेव्हा उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे ती रक्कम सोपविण्यात आली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 19:55


comments powered by Disqus