Last Updated: Wednesday, May 21, 2014, 15:15
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीत सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये 11 किलो सोने आणि 35 किलो चांदी चोरी करण्यात आली. या चोरीची चौकशीनंतर शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
10 मे रोजी दिल्लीतील विक्रीकर कार्यालयातून जप्त केलेले तब्बल 11 किलो सोने आणि 35 किलो चांदी चोरीला गेली. या चोरीची पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी सुरु झाली. चौकशीदरम्यान कार्यालयात काम करणाऱ्या शिपायाची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर या शिपायाने आत्महत्या केली. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
चोरी गेलेले सोने आणि चांदी पोलिसांनी कारवाई करताना नवी दिल्लीतील रेल्वे स्टेशनवरुन मार्च महिन्यात जप्त करण्यात आली होती. सोने आणि चांदी एका डब्यात बंद करुन ठेवण्यात आले होते. व्यापारी भवनातील 13 मजल्यावर विक्रीकर कार्यालयात सोने, चांदी ठेवण्यात आले होते.
कार्यालयाच्या बाहेर दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. ज्यामध्ये सोने, चांदी होती तेथील लोखंडाचे दरवाजे होते. ते दरवाजे तोडण्यात आलेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चोरीत या शिपायाचा हात होता. असे त्याने लिहिलेल्या चिठ्ठीवरुन समजले, असे पोलिसांनी सांगितले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 15:15