दिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक Serial rapiest in delhi

दिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक

दिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये एक सीरियल रेपिस्टचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील वसंता नावाच्या एका कुख्यात गुंडाने आपण सीरियल रेपिस्ट असून, गेल्या १० महिन्यात ८ बलात्कार केल्याचे मान्य केलंय. वसंता हा दिल्लीतील ५७ वर्षीय एक कुख्यात गुंड असून, त्याच्यावर या आधीही बलात्कार, खूनाचा प्रयत्न आणि चोरी करणे असे गुन्हे दाखल कतण्यात आले होते.

राम मनोहर लोहिया हॉस्पिटलजवळ ६ मे रोजी ३० वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. या बलात्काराची पोलिसांकडून चौकशी सुरू असताना, वसंताला ताब्यात घेण्यात आले. यावेळी वसंताने गेल्या १० महिन्यात ८ बलात्कार केल्याचे मान्य केले. पोलिसांकडे मात्र या आधीच्या ७ बलात्कारांची माहितीच नव्हती. मात्र आता पोलिसांकडून त्या सात बलात्कार पीडित महिलांची चौकशी करण्यात येणार आहे.

पोलिसांच्या माहिती नूसार,`वसंता नेहमीच खालच्या वर्गातील महिलांना आपल्या वासनेचं शिकार बनवत होता. तसेच बलात्कार केल्यानंतर वसंता त्यांना धमकावून सोडत असे, या कारणाने बलात्कार पीडित महिलांनी वसंता विरुद्ध पोलिसांत तक्रार केली नव्हती.`

वसंता गेली ४० वर्ष गुन्हेगारी जगताशी संबंध ठेऊन आहे. आतापर्यंत वसंतावर २४ गुन्हे दाखल असून, एका गुन्ह्याची शिक्षा भोगून वसंता २०१२ मध्येच जेल मधून बाहेर आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 15:40


comments powered by Disqus