Last Updated: Sunday, December 23, 2012, 15:42
www.24taas.com,नवी दिल्ली देशाची राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात जोरदार निर्दशने सुरू असल्याने येथील सात सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. इंडिया गेट परिसरात आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
दिल्लीत २३ वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीवर बसमध्ये गँगरेप आला. यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिल्लीत गेले दोन दिवस आंदोनल करण्यात येत आहे. राष्ट्रपती भवन येथे हे आंदोलन सुरू आहे. तर इंडिया गेट परिसरात मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रुधाराचा वापर केला. तर आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे आंदोलनक संतप्त झाले आहेत.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आज पहाटे हटविले. तसेच दिल्लीत पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या परिसरात वृत्तवाहिन्यांना वार्तांकनास बंदी घालण्यात आली आहे.
इंडिया गेट परिसरात आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाल्याने या परिसरात जमाबबंदीचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, गर्दीला रोखण्यासाठी सात मेट्रोची स्थानके बंद करण्यात आली आहेत. मंडी हाऊस, बाराखंभा रोड, पटेल चौक, केन्द्रीय सचिवालय, खान मार्केट, उद्योग भवन आणि रेस कोर्स मेट्रो या स्टेशनचा यात समावेश आहे. ही स्थानके बंद ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सूचना केल्यात.
First Published: Sunday, December 23, 2012, 10:44