आसाममध्ये हिंसाचार, Seven more bodies recovered in Assam, death toll in militant attacks rises to 30

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांचा हिंसाचार सुरुच, 30 ठार

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांचा हिंसाचार सुरुच, 30 ठार
www.24taas.com, झी मीडिया, गुवाहाटी

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात 30 नागरिक ठार झाले आहेत. यातील 12 मृतदेह बक्सा जिल्ह्यात आढळले आहेत. या हल्ल्यानंतर क्रोक्राझार, चिरंग आणि बाक्सा या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

कोक्राझार आणि बाक्‍सा या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या दोन जिल्ह्यांत गुरूवार रात्रीपासून नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट बोडोलॅंडच्या (एनडीएफबी) दहशतवाद्यांच्या हिंसाचारात महिला आणि मुलांसह 23 जण ठार तर 14 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बोडोंच्या हल्ल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांत दिसताक्षणी गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर चिरांग जिल्ह्यात अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बाक्‍सा जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.

40 बोडो दहशतवाद्यांनी एके-47 रायफलींसह कोक्राझार जिल्ह्यातील बालापारा गावातील तीन घरांत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सात जण जागीच ठार झाले. आसामचे पोलीस अधिकारी आर. एल. बिश्‍नोई यांनी सांगितले, मृतांत सात लोकांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे.

नानकेखाद्राबरी आणि नायानगुडी गावांतून गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेले 12 मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये एका मुलाचा आणि पाच महिलांचा समावेश आहे. दरम्यान, काल रात्री बोडो दहशतवाद्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 10:37


comments powered by Disqus