Last Updated: Wednesday, January 9, 2013, 15:47
www.24taas.com, नवी दिल्लीसहा सिलिंडर अनुदानित दराने आणि त्यापुढील बाजारदराने देण्याच्या निर्णयापासून लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित दराने विकले जाणारे सातवे, आठवे आणि नववे सिलिंडर बाजारभावाने न विकता अनुदानित किमतीवर केवळ १०० रुपयांनी वाढवण्याची शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रिमंडळाला केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
सप्टेंबर २०१२मध्ये सरकारने वर्षाकाठी केवळ सहाच सिलिंडर अनुदानित दराने देणार असल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा सर्व थरांतून विरोध करण्यात आला होता. सातव्या सिलिंडरपासून पुढील सर्व सिलिंडर बाजारभावाने विकत घ्यावे लागतात. यासाठी ग्राहकांना जवळपास ९९१ रुपये मोजावे लागतात.
पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार सहा सिलिंडर अनुदानित दराने देण्यात यावेत. तर सातवा, आठवा आणि नववा सिलंडर बाजार भावाने न देता अनुदानित दरापेक्षा १०० रुपये अधिक आकारून देण्यात यावा. दहाव्या सिलिंडरपासून बाजाराभावाने सिलिंडर देण्यात यावेत.
First Published: Wednesday, January 9, 2013, 15:47