Last Updated: Monday, June 10, 2013, 17:14
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवार आणि रविवारी रात्री केलेल्या कारवाईत बुलंदशहर येथील शहरी तसेच ग्रामीण भागात घर तसेच हॉटेलमध्ये छापे टाकून सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
पोलिसांनी रविवारी संध्याकाळी दोन दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनी आणि चार महिला दलालांसह २५ मुलींना ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या मुलींनंतर सध्या परिसरात छापेमारी सुरू आहे.
पोलिसांनी रात्री कारवाई करताना दोन हॉटल मॅनेजर, संचालक आणि काही वेटरर्सला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५४ हजार कॅश ४० मोबाईल ताब्यात घेतले आहे.
या सेक्स रॅकेटमध्ये तीन स्थानिक सदस्यांचे नाव समोर आले असून आणखी मोठे मासे यात अडकण्याची शक्यता आहे. सेक्स रॅकेट संपूर्ण एससीआर (राजधानी दिल्ली)मध्ये पसरले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 10, 2013, 17:14