Last Updated: Wednesday, February 20, 2013, 17:04
www.24taas.com, नवी दिल्ली दिल्लीत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये एयर हॉस्टेस आणि मॅनेजमेंटचा (MBA) च्या विद्यार्थींनी सुद्धा सामील होत्या. आणि हे सेक्स रॅकेट चालविणारी व्यक्ती एक धर्मगुरु आहे. दक्षिण दिल्लीतील खानपूर भागात हे सेक्स रॅकेट कार्यरत होतं.
राजीव रंजन द्विवेदी या नावचा व्यक्ती चालवित होता. तो स्वत:ला एका मंदिराचा एक पुजारी असल्याचे सांगत होता. खानापूर परिसरात एक मंदिरही बनविले आहे. आणि याच मंदिर परिसरात तो सेक्स रॅकेटचे संचलन करीत होता. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सहा मुलींसह एका ग्राहकाला अटक करण्यात आली आहे. मात्र तो धर्मगुरू अजूनही फरार आहे.
अटक केलेल्या मुलींपैकी दोन ह्या एयर हॉस्टेस आहेत. तर काही मुली ह्या नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे. मंदिर परिसरात सेक्स रॅकेट चालू असल्याचे दिल्ली पोलिसांना खबर मिळताच त्यांनी तिथे छापा टाकला. त्यामुळे धर्मगुरूचा बुरखा पोलिसांनी फाडला आहे.
First Published: Wednesday, February 20, 2013, 16:50