इंदूरहून व्हाया दिल्ली जोधपूरला रवाना आसाराम बापू! Sexual assault case: Asaram to be taken to Jodhpur today

इंदूरहून व्हाया दिल्ली जोधपूरला रवाना आसाराम बापू!

इंदूरहून व्हाया दिल्ली जोधपूरला रवाना आसाराम बापू!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना इंदूरहून अटक केल्यानंतर आता व्हाया दिल्ली जोधपूरला घेऊन जातायेत. त्यादरम्यान एक ते दोन तासांसाठी त्यांना दिल्ली विमानतळावर थांबविण्यात येईल.

अटक करण्यापूर्वी आसाराम बापूंची इंदूर इथल्या आश्रमात चौकशी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक आश्रमाबाहेर उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाराम बापू पोलिसांच्या चौकशीत काहीच मदत करत नाहीयेत. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. शेवटी ओढतच आसाराम बापूंना गाडीत बसवण्यात आलं. शिवाय त्यांचा चेहराही झाकण्यात आला होता.

संपूर्ण रात्र आसाराम बापू इंदूर विमानतळावर होते. त्यांना आता दिल्लीत आणलं गेलंय. दिल्लीहून ते जोधपूरला रवाना होतील. तिथं कोर्टात हजर करुन त्यांना न्यायालयिन कोठडी दिली जावू शकते. दुपारी १च्या सुमारास आसाराम बापू जोधपूरला पोहोचतील. जोधपूरमध्ये आसाराम बापूंच्या समर्थकांची वाढती संख्या बघून तिथं पोलिसांच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्यायेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 1, 2013, 09:52


comments powered by Disqus