Last Updated: Thursday, January 23, 2014, 15:32
www.24taas.com, झी मीडिया, जबलपूर नेहमीच इतरांना शांतीचा संदेश देणाऱ्या धार्मिक गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं एक वेगळंच रुप पत्रकारांसमोर आलंय. मोदी पंतप्रधान बनले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल, असं प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला स्वामी स्वरुपानंदांनी एक थोबाडीत देऊन उत्तर दिलंय.
मंगळवारी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी एका पत्रकाराच्या श्रीमुखात भडकावल्याचनं खळबळ उडालीय. मोदींच्या पतंप्रधानापदाबाबत प्रश्न विचारला असता शंकराचार्य अचानक भडकले आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला श्रीमुखातच भडकावली. त्यानंतर मात्र शंकराचाऱ्यांनी स्पष्टीकरण देत `राजकाराणी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपण भडकल्याचं` स्पष्टीकरण दिलंय.
एरव्ही, राजकारण्यांची वर्दळ झेलणाऱ्या स्वामी स्वरुपानंद यांना मोदींच्या पंतप्रधानपदाविषयी प्रश्न विचारल्यानंतर नेमका कशाचा राग आला? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 23, 2014, 15:25