Last Updated: Monday, February 10, 2014, 09:59
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं खुद्द शरद पवार यांनीच अखेर मान्य केलंय. ठाण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही कबुली दिलीय.
गेल्या आठवड्यात पवारांनी मोदींची भेट घेतल्याच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून पवार-मोदी भेटीचा सपशेल इन्कार करण्यात आला होता. परंतु, आता मात्र पवारांनीच उघडपणे आपल्या मोदी भेटीचं समर्थन केलंय.
`नरेंद्र मोदी आणि माझ्या भेटीची चर्चा होते. पण मी काही कुणा पाकिस्तानी वा चिनी व्यक्तीला भेटलेलो नाही` असं पवार म्हणाले. `लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे याचा मी विचार करत नाही. एक केंद्रीय मंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडत असतो` अशी पुस्तीही पवारांनी यावेळी जोडली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 9, 2014, 22:45