शरद पवार आणि गडकरींचं साटंलोट?, sharad pawar and Nitin gadkari,

शरद पवार आणि गडकरींचं साटंलोट?

शरद पवार आणि गडकरींचं साटंलोट?
www.24taas.com, नवी दिल्ली

नितीन गडकरी आणि पवार यांचे व्यावसायिक संबध नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं आहे. शरद पवार आणि एका विरोधी पक्षाच्या अध्यक्षांचे संबध असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या आरोपांवर भाजपनं स्पष्टीकरण दिलं आहे.

एका विरोधी पक्षाच्या अध्यक्षाचं शरद पवार य़ांच्याशी साटंलोट असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. या नंतर भाजप आणि दमानिया यांच्यात चांगलीच जुंपलीये.

शरद पवार आणि नितीन गडकरींचे कोणतेही व्यावसायिक संबध नसल्याचं भाजपनं म्हटलयं. दमानिया यांना काँग्रेसशी फूस असल्याचं भाजपनं म्हटलयं. यावर दमानिया यांनी भाजपच्या आरोपांचा इन्कार केलाय.

First Published: Thursday, September 27, 2012, 13:20


comments powered by Disqus