Last Updated: Tuesday, October 30, 2012, 10:57
www.24taas.com, नवी दिल्लीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याच महिला खासदार व माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री अगाथा संगमा यांना फसवले आहे. आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर काढताना फसवले असून आपला जुनाच राजीनामा पंतप्रधानांकडे सादर करण्यात आला, असा आरोप केला आहे.
आपणास मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यापूर्वी ना पक्षाने विचारले ना सरकारने, असे सांगून त्या म्हणाल्या, आपण या आठवड्यात राजीनामा दिलाच नाही, मग तो राजीनामा कसा स्वीकारला? तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकार घटक पक्षांना विश्वासात घेत नाही म्हणून जेव्हा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामे दिले होते.
त्यावेळी आपणही जुलैमध्ये राजीनामा दिला होता. आता तोच राजीनामा पंतप्रधानांनी राष्ट्रपतींकडे पाठवला, असे अगाथा संगमा यांनी सांगितले.
First Published: Tuesday, October 30, 2012, 10:44