मुदतपूर्व निवडणुकांसाठी सज्ज व्हा- शरद पवार, Sharad Pawar on Election

मुदतपूर्व निवडणुकांसाठी सज्ज व्हा- शरद पवार

मुदतपूर्व निवडणुकांसाठी सज्ज व्हा- शरद पवार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आंध्र प्रदेशातील तिढ्यामुळं लोकसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पवारांनी हे संकेत दिले.

एवढेच नव्हे तर निवडणुकांसाठी तयारीला लागा, अशी सूचनाही पवारांनी यावेळी केली. दरम्यान, शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाच्या दृष्टीनंही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल होऊ शकते, अशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 22:23


comments powered by Disqus