पाकिस्तानात जाऊन मी कुणाला भेटलो नाही ना? - पवार

पाकिस्तानात जाऊन तर मी कुणाला भेटलो नाही ना? - पवार

पाकिस्तानात जाऊन तर मी कुणाला भेटलो नाही ना? - पवार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मी मुख्यमंत्र्यांना भेटलो ना?, चीन किंवा पाकिस्तानात तर जाऊन कुणाला भेटलो नाही ना?, असा सवाल शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नावर केला आहे.

देशाचे कृषी मंत्री या नात्याने आपले देशातील अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी भेट होत असते. यात विरोधीपक्षातील मुख्यमंत्र्यांचाही समावेश असतो, असंही यावेळी पवारांनी सांगितलं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही आपली भेट झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही आपण भेटलो आहोत, असंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं.

तसेच आपण मुख्यमंत्र्यांनाच भेटलो ना?, चीन किंवा पाकिस्तानात जाऊन कुणाला भेटलो नाही ना?, असा सवालही यावेळी शरद पवारांनी केला.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात गुप्त भेट झाली, यावर आलेल्या बातम्यांवर शरद पवार बोलत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 9, 2014, 12:51


comments powered by Disqus