Last Updated: Tuesday, October 30, 2012, 14:01
www.24taas.com, नवी दिल्लीकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून टीम मनमोहन जाहीर करण्यात आली आहे. टीम मनमोहनमध्ये 33 जण सदस्य आहेत.
या टीममध्ये मनमोहनसिंग यांच्यानंतर संरक्षणमंत्री ए के एन्टोनी यांना दुसरं स्थान देण्यात आलंय. तर तिसरं स्थान केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांना देण्यात आलंय. टीम मनमोहनचं वैशिष्ट्यं म्हणजे राष्ट्रवादी, नॅशनल कॉन्फरन्, डीएमके आणि राष्ट्रीय लोकदल अशा पक्षांच्या मंत्र्यांचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचाही यादीत समावेश आहे.
या शिवाय अजितसिंग फारुख अब्दुल्ला यांचाही टीममध्ये समावेश आहे. ‘टीममध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान असावं’ या शरद पवारांच्या मागणीकडं मात्र दुर्लक्ष करण्य़ात आलंय.
First Published: Tuesday, October 30, 2012, 14:01