Last Updated: Thursday, January 31, 2013, 16:43
www.24taas.com, नवी दिल्लीशिवसेना - मनसे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही असा टोला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हाणला आहे. राज ठाकरेंसोबत युतीने तीन निवडणुका लढली आहे. मात्र दोन वेळा पराभूत होऊन केवळ एक वेळाच विजय मिळाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
सामनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छापून आलेल्या मुलाखतीत, राज आणि उद्धव एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्यानंतर राज्यभरात याच प्रश्नाकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. अनेक पक्षांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. आज शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. राज-उद्धव एकत्र आले तरी काहीही फायदा नाही. असं म्हणत पवार यांनी त्यांच्या या चर्चेला जणूकाही पूर्णविरामच दिला आहे.
`शिवसेना-मनसे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही,` `राजसह ३ वेळा निवडणूक लढले दोन वेळा तेव्हाही हरले. त्यामुळे आता एकत्र झाले तरी काही पडणार नसण्याचे सुतोवाच शरद पवार यांनी केले आहे.
First Published: Thursday, January 31, 2013, 16:31