बलात्कारी आरोपीचे हात-पाय तोडून टाका - यादव, Sharad Yadav Statement on Rape Case

बलात्कारी आरोपीचे हात-पाय तोडून टाका - यादव

बलात्कारी आरोपीचे हात-पाय तोडून टाका - यादव
www.24taas.com, रेवाडी

बलात्काराचा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. राज्यातच नव्हे तर देशभरात ह्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे बलात्कारच्या घटनांना लगाम घालण्यासाठी आजवर अनेक गोष्टी अमंलात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र वासनेच्या पोटी अनेक तरूण वाहवत जातात. आणि अशाच तरूणांना वठणीवर आणण्यासाठी एक जालीम उपाय जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी शोधला आहे. बलात्कारांच्या घटनेतील आरोपीचे सरळ हात-पाय तोडावे अशा शिक्षेची त्यांनी मागणी केली आहे.

खाप पंचायत राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही यादव यांनी केला. खाप पंचायत एकेक अजब फतवे काढत आहे, पण दलित आणि महिलांच्या सुरक्षेबाबत ती ढिम्म बसून आहे.

हरयाणातील बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे देशभर गदारोळ उठला असतानायांनी यापुढे बलात्कार करणार्‍यांचे हात पाय तोडा, असा सल्ला दिला आहे. यूपीए सरकारवर त्यांनी कडाडून हल्ला चढवताना सरकारमुळे देश बर्बाद झाला आहे, असे सांगितले.


First Published: Saturday, November 3, 2012, 19:40


comments powered by Disqus