शशी थरूर यांना लव मंत्रालयाचे लव गुरू बनवा- नक्वी , Shashi Tharoor is Minister of love affairs, say`s Nakwi

शशी थरूर यांना लव मंत्रालयाचे लव गुरू बनवा- नक्वी

शशी थरूर यांना लव मंत्रालयाचे लव गुरू बनवा- नक्वी
www.24taas.com, नवी दिल्‍ली

"वाह क्या गर्लफ्रेंड है!" गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ह्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्‍यमंत्री शशी थरूर यांच्या पत्‍नी सुनंदा पुष्‍कर यांनी नरेंद्र मोदी यांनी महिलांबाबत सन्मान करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मोदींच्या वक्तव्यावरुन देशभर राजकीय आणि सामाजिक पातळीवर टीका होत आहे.

भाजपचे प्रवक्ते मुख्‍तार अब्‍बास नक्वी यांनी मोदींच्या वक्तव्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र शशी थरुर यांना `मिनिस्ट्री ऑफ लव अफेयर्स` बनवले गेले पाहिजे, असे म्हटले आहे. सुनंदा यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, गुजरातसारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तरीही मी त्यांच्याकडून माफीची अपेक्षा ठेवत आहे.

त्यांनी आपल्या राज्याची ( गुजरात दंगलीतील पीडितांची) माफी मागितली नव्हती मग मला तरी माफी कसे मागतील?. मोदींनी अभद्र टीप्पणी केल्यानंतर महिलांनी व त्याचबरोबरीने पुरुषांनीही मोठ्या प्रमाणात मोदींच्या वक्तव्याचा विरोध केला त्याचा मला आनंद आहे.

First Published: Wednesday, October 31, 2012, 15:48


comments powered by Disqus