वस्तऱ्यानं घेतला जीव, दाढी करणं पडलं महागातShaving Razor kill him, accused escape

वस्तऱ्यानं घेतला जीव, दाढी करणं पडलं महागात

वस्तऱ्यानं घेतला जीव, दाढी करणं पडलं महागात
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

बिहारमधील नालंदा इथं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दाढी करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. केशकर्तनकाराकडून चुकीच्या पद्धतीनं वस्तरा चालविण्यात आल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस आता केशकर्तनकाराचा शोध घेत आहेत.

नालंदा जिल्ह्यातील चंद्रपुरा गावातील ईश्‍वर पासवान यांनी दाढी करण्यासाठी गावातील केशकर्तनकार नन्हू ठाकूर याला बोलविलं होतं. दाढी करताना ठाकूर याच्याकडून पासवान यांची मानच चिरली गेल्यानं मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. पासवान यांची मान चिरली गेल्याचं कळताच ठाकूरनं तिथून पळ काढला. मात्र, मानेतून अतिरक्तस्राव झाल्यानं ईश्‍वर पासवान यांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपुरा पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे. दाढी करते वेळी ठाकूरनं दारू प्यायलेली असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 10:21


comments powered by Disqus