मोदी नंबर १... मी नंबर ३- शिवराज चौहान Shivraj Chouhan on Modi

मोदी नंबर १... मी नंबर ३- शिवराज चौहान

मोदी नंबर १... मी नंबर ३- शिवराज चौहान
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आपली तुलना करणे चुकीचे असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते नंबर १ आहेत. मी नंबर ३ आहे.

भाजपच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी आयोजित समारंभाच्या वेळी चौहान पत्रकाराना म्हणाले की, मोदींशी तुलना करणे चुकीचे आहे. मी मध्य प्रदेशात काम करत आहे. त्यापलीकडे आपली महत्त्वाकांक्षा नाही. भाजपच्या संसदीय मंडळावर मोदींची नुकतीच वर्णी लावण्यात आली आहे, तर चौहान यांना वगळण्यात आले आहे. काँग्रेसशासित राज्यांच्या तुलनेत भाजपशासित राज्यांमध्ये चांगला विकास होत असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यामुळे चौहान हे स्वत:ची मोदींशी तुलना करत असल्याचा अर्थ त्यातून काढण्यात आला होता. या वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमांच्या बळावर राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 23:51


comments powered by Disqus