Last Updated: Friday, June 20, 2014, 15:39
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीरेल्वेला पूर्णपणे बदलून टाकणाररेल्वेला चालविण्यासाठी पारंपारिक विचार आणि वर्तमान पद्धत पुरेशी नाही. त्यामुळे नवे काहीच हाती लागणार नाही. काही करत नसल्याचे स्पष्टीकरण किंवा कोणतेही कारण आता मोदी सरकार खपवून घेणार नाही. आमच्या सरकारचा मंत्र आहे, काम करा नाही तर चालते व्हा, असे रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी देशभरातील रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.
रेल्वे मंत्र्यांनी देशभरातून आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा इशारा दिला. सर्वांना मिळून उपाय शोधावा लागेल,त्यामुळे भारताची रेल्वे ही जागतिक दर्जाची होईल.
रेल्वे मंत्र्यांनी पहिल्यांना रेल्वे महा प्रबंधकांच्या बैठकीत विभागीय रेल्वे प्रबंधक आणि सर्व उपक्रमांच्या प्रमुखांना बोलावले होते. बैठकीत बोलताना गौडा म्हणाले, आतापर्यंत रेल्वेमध्ये जे झाले नाही, ते आपल्याला करून दाखवायचे आहे. यासाठी समर्पित भाव आणि लक्ष्य गाठण्याचे इच्छा असलेली टीम हवी आहे. आज आपण क्षमता, वक्तशीरपणा आणि स्वच्छतेच्या बाबतीत खूप मागे आहोत.
जगाला द्यायची आहे चांगली रेल्वे सेवाचीनची रेल्वे आपल्यापेक्षा चार पट अधिक सक्षम आहे. आपण जगात सर्वात चांगली रेल्वे सेवा का देऊ शकत नाही. देशातील लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. रेल्वेतील समस्यांसाठी केवळ पैसा ही एक अडचण आहे का, की या खेरीज इतरही कारण आहे. सर्वांना मिळून आपल्या उपाय शोधावा लागेल.
रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या विभागात रेल्वेमंत्री किंवा रेल्वे बोर्डाचे चेअरमन म्हणून काम करा. प्रत्येक जण आपल्या विभागात होणाऱ्या चांगल्या वाईट कामासाठी जबाबदार असेल. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला सांगितले की, त्यांनी महाप्रबंधकांऐवजी विभागीय स्तराच्या (डीआरएम) अधिकाऱ्यांशी संवाद वाढवावा. त्यांनी प्रत्येक रेल्वे अधिकाऱ्याला सांगितले की कोणत्याही संदेह मनात न ठेवता मला थेट फिडबॅक देऊ शकतात. असे करणाऱ्या ऑफिसरचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 20, 2014, 15:39