मला नाकारून लोकांनी सत्य नाकारलंय- श्वेता भट्ट Shweta Bhatt ‘sad’ after losing to Narendra Modi

मला नाकारून लोकांनी सत्य नाकारलंय- श्वेता भट्ट

मला नाकारून लोकांनी सत्य नाकारलंय- श्वेता भट्ट
www.24taas.com, मणिनगर

मणिनगरमध्ये नरेंद्र मोदींविरोधात नेटाने उभ्या असलेल्या श्वेता भट्ट यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे श्वेता भट्ट खूप दुःखी झाल्या आहेत. श्वेता भट्ट या निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी आहेत.

लोकांनी आपल्याला नाकारल्याचं दुःख व्यक्त करताना श्वेता भट्ट म्हणाल्या, “गुजरकातचे लोक रंगीबेरंगी प्रचाराला फसले आणि त्यांनी सत्य नाकारण्याची चूक केली आहे.” नरेंद्रा मोदींनी श्वेता भट्ट उभ्या असलेल्या विभागात दणदणीत विजय संपादन केला. 1,20,470 मतांपैकी मोदींनी 86, 373 मतं मिळवत विजय नोदवला, तर श्वेता भट्ट यांना केवळ 34,097 मतं मिळाली.

मात्र, श्वेता भट्ट काँग्रेसबद्दल समाधानी आहेत. काँग्रेसने आपल्याला पूर्ण पाठिंबा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपण यापुढेही मणिनगरमध्ये समाजकार्य करतच राहू असं त्या म्हणाल्या. “राजकारण हा माझ्या व्यवसाय नाही” असंही त्या म्हणाल्या.

First Published: Thursday, December 20, 2012, 14:54


comments powered by Disqus