Last Updated: Monday, March 3, 2014, 00:20
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी आपल्या नव्या संविधान नावाच्या टीव्ही मालिकेसह टेलव्हिजनवर कमबॅक केला आहे.
श्याम बेनेगल यांनी २५ वर्षापूर्वी भारत एक खोज मालिका टेलिव्हिजनवर आणली होती. आता तब्बल पंचवीस वर्षांनी त्यांनी कमबॅक केला आहे.
आमीर खानच्या सत्यमेव जयते मालिकेची जेवढी चर्चा आज झाली, तेवढीच चर्चा आज संविधानची झाली.
भारत एक खोज १९८८ मध्ये टेलिव्हिजनवर आली होती, यानंतर आज संविधान प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत १९४६ आणि १९५० च्या घटनांचा उल्लेख आहे.
या मालिकेचं प्रसारण राज्यसभा टीव्हीवर आजपासून होत आहे. संविधान या मालिकेचा पहिला एपिसोड यू-ट्यूबरही उपलब्ध आहे.
भारतीय संविधान लिहण्यासाठी २ वर्ष आणि ११ महिने लागले होते, तेवढ्याच दिवसात शाम बेनेगल यांनी या मालिकेचं शुटिंग पूर्ण केलं. या मालिकेत स्टार कास्ट करण्यासाठी बडी मंडळी आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 3, 2014, 00:20