‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’ , siddhu crity sayjes congress

‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’

‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’
www.24taas.com झी मीडिया, अमृतसर

अमृतसरचे खासदार नवजोत सिंह सिध्दू हे राजकारणात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त दिसत आहेत. मात्र पुन्हा सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसवर हल्लाबोल करत आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे.

बुधवारी झालेल्या बीजेपीच्या मोर्चा बैठकीत सिद्धूने काँग्रेसबद्दल बोलताना कॉग्रेसवर निशाणा साधत, ‘कॉग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम आहे.’ असं म्हटलं. कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या शो मध्ये दिसणारा माजी क्रिकेटर सिद्धू आपला मतदारसंघ असणाऱ्या अमृतसरमधून गायब होता. अमृतसरमध्ये अनेक ठिकाणी सिद्धू गायब असल्याचे पोस्टर लावले गेले होते. सिध्दू आपल्या संसदीय कामकाजापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून सिध्दू गायब झाला आहे, असा आरोप सिध्दूवर केला आहे.

अमृतसरमधील संघर्ष समिती मार्फत लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये रमन बख्शी आणि रणजीत राना यांच्या नावाचा उल्लेख केला आहे जे संघर्ष समितीच्या आधिकारी पदी आहेत. याआधी अशी बातमी होती की, सिद्धू हे राजकारणातून संन्यास घेणार आहेत. पण त्यांनी मोर्चा बैठकीत येऊन आपल्या टीकाकारांना आपण अजूनही राजकारणात असल्याचा इशारा दिला आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 20:27


comments powered by Disqus