Last Updated: Sunday, March 24, 2013, 18:31
www.24taas.com, सातारादिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला शीख समाजानेही अभिवादन केलं आहे. शीख समाजाचे संस्थापक धर्मगुरू गुरू नानक यांच्या जीवनावर तयार होत असणारा चित्रपट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करण्यात येणार आहे.
शीख धर्माचे संस्थापक असणाऱ्या गुरू नानक यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची तयारी शीख समाजाने सुरू केली आहे. हा चित्रपट सर्व भारतीय भाषांमध्ये तसंच काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये बनणार आहे. `गुरू नानक शाह फकीर` असं या सिनेमाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट शिख धर्म संप्रदायाशी संबंधित असूनही हा चित्रपट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करण्यात येत आहे.
या सिनेमाद्वारे जागतिक स्तरावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली जात असल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांनी म्हटलं. १९८४ साली शीख विरोधात उसळलेल्या दंगलींमध्येही महाराष्ट्रात शीख समाज सुरक्षित राहिल्याचं श्रेय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जात असल्याचं हरिंदर सिंग सिक्का यांनी म्हटलं आहे.
First Published: Sunday, March 24, 2013, 18:31