Last Updated: Friday, June 6, 2014, 20:45
www.24taas.com, झी मीडिया, अमृतसरअमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत.
शिखांचं पवित्र धर्म स्थळं सुवर्ण मंदिरात कोण आधी बोलेल, यावरून दोन गटात झालेल्या झटापटीत सहा जण जखमी झाले आहेत.
अमृतसर शहरात सध्या शांती आहे, पोलिसांकडून या प्रकरणी आणखी माहिती जमा करण्याचं काम सुरू आहे.
अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टारला तीस वर्ष पूर्ण झाले आहेत, यानिमित्ताने सुवर्ण मंदिरात एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होत.
काही टीव्ही चॅनेल्सवर सुवर्ण मंदिराच्या पायऱ्यांवर दोन गटांतील काही जण एकमेकांवर तलवार उगारतांना दिसतायत.
ब्लू स्टार ऑपरेशनअमृतसरमधील सुवर्ण मंदिरात 1984 साली दहशतवादी घुसले होते, दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या कारवाई, 1 हजार जण मारले गेले होते. या ऑपरेशनला ऑपरेशन ब्लू स्टार नाव देण्यात आलं होतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 6, 2014, 13:21