Last Updated: Wednesday, April 16, 2014, 11:22
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरूकर्नाटकमध्ये बंगळुरूच्या दिशेनं निघालेल्या एका प्रवासी बसला चित्रदुर्गजवळ आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 12 जणं जखमी झालेत.
कर्नाटकमधील दावणगिरी इथून बंगळुरकडे येत असलेल्या एसी स्लीपर बसला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. मृतांमधल्या सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.
जखमींमध्ये तिघांची प्रकृती खूप गंभीर असून 12 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. 23 जण यातून बचावलेत. बसचा ड्रायव्हर फरार आहे. आग लागल्याचं कळताच बस ड्रायव्हर फरार झाला आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 11:22