Last Updated: Friday, February 28, 2014, 19:18
www.24taas.com, झी मीडिया, दंतेवाडाछत्तीसगडमधील दंतेवाड्यात पोलिसांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सहा पोलिस शहीद झाले आहेत.
कुआकोंडा पोलिस ठाणे क्षेत्रातील, शामगिरी डोंगरात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात, एका पोलिस निरीक्षकासह सात पोलिस शहीद झाले आहेत.
शामगिरी पहाडांमध्ये कुआकोंडापासून बचेलीपर्यंत रस्त्याचं काम सुरू होतं.
आज छत्तीसगड पोलिसांचे दहा कर्मचारी रस्ते सुरक्षासाठी रवाना झाले होते. यावेळी पोलिस कर्मचारी जेव्हा पहाडांवर पोहोचले तेव्हा, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलिस दल बोलावण्यात आलं. घटनास्थळी घनदाट जंगल असल्याने, शहीद पोलिसांची माहिती मिळवण्यात उशीर होत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 28, 2014, 19:18