Last Updated: Saturday, August 3, 2013, 19:47
www.24taas.com झी मिडिया, लखनऊमुलाला बाईक देण्यास नकार दिल्यामुळे एका वडिलांना आपला जीव गमवावा लागला. बाईक देणार नाही असे म्हटल्यावर मुलाने आपल्या वडीलांना काठीने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. आणि तेथून तो फरार झाला.
ही घटना बालिया जिल्ह्यातील एका निफ्सी गावामध्ये सोमवारी रात्री घडली. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पूर्ण चौकशी केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीच्या लहान भावाच्या जबानी वरून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
शिवानंद गिरी (६२) हे दोन वर्षापासुन निफ्सी या गावात राहात असुन ते सेवानिवृत्त शिपाई होते. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून शिवानंद गिरी आणि त्यांचा मुलगा आरोपी अनिल यांच्यात आधीपासुनच वाद होत असल्याने ते पाच वर्षापासून वेगळे राहत होते.
अनिलने सोमवारी काही कामा निमित्त वडिलांकडे बाईक मागितली होती. पण वडिलांनी नकार दिल्याने त्याला राग अला अणि आरोपी बाईकची तोडफोड करू लागल्याने वडिलांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याने वडीलांवर त्याच काठीने वार करून त्यांची हत्या केली, त्यामुळे शिवानंद गिरी हे जबर जखमी झाले. शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटालमध्ये दाखल केले. पण उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 3, 2013, 19:47