Last Updated: Tuesday, August 6, 2013, 09:36
www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांची वेगळीच `दांडी`यात्रा सध्या सुरू आहे. त्यांची संसदेतील उपस्थिती कमी दिसून येत आहे.
लोकसभेच्या निम्म्याहून अधिक बैठकांना दांडी मारणा-या ९२ खासदारांमध्ये राहुल गांधीसोबतच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे. सोनियांनी ४८ टक्के, तर राहुल गांधींनी केवळ ४३ टक्के बैठकांना हजेरी लावलीय.
याउलट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची उपस्थिती ८२ टक्के, तर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंहांची उपस्थिती८० टक्के इतकी आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात महत्वाची विधेयक मांडली जाणार असल्यामुळे सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षातील सर्व खासदारांना सदनात उपस्थिती राहण्याची सूचना दिली आहे.
First Published: Tuesday, August 6, 2013, 09:23