सोनिया गांधीना `दस नंबरी` - मोदी, Sonia gandhi dus numbri - Modi

सोनिया गांधीना `दस नंबरी` - मोदी

सोनिया गांधीना `दस नंबरी` - मोदी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीचं टार्गेट आहे ते काँग्रेस. त्यातही सोनिया गांधी आणि राहुल गांधी. मोदी देशात कुठंही गेले की, भाषणात वेगवेगळी विशेषणं लावून गांधी घराण्यावर जोरदार हल्ला करतात. राहुल गांधींना कधी `शहेजादा` तर सोनिया गांधीना `दस नंबरी` संबोधतात.

काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदींच्या जिभेला वेगळीच धार चढते. मग समोर राहुल गांधी असोत, नाहीतर सोनिया गांधी. यावर मोदी सांगतात, काँग्रेस दस नंबरी....दस नंबरी यासाठी म्हणालो की कारण सोनिया गांधी दस जनपथला राहतात.

धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरूण काँग्रेस पक्षच देशात फूट पाडत असल्याचा आरोप मोदी आपल्या भाषणात करतात. संकट आले की काँग्रेस नेहमी सेक्युलिरिजमची भाषा सुरू करते. पण खरी फूट पाडण्याचं काम त्यांनीच केले.

राहुल गांधी यांना टार्गेट करताना मोदी सांगतात, नक्की मोठ कोण राहुल गांधी की संविधान...कोर्टाचा आदेशावर राहुल गांधी आँर्डिनसचा मुद्दावर कोर्टाला आव्हान देतात. काँग्रेस सरकारच्या १० वर्षांच्या कारकिर्दीला ते थेट आव्हानच देतात. हे सांगताना अटलबिहारी वाजपेयींचं सरकार यूपीएपेक्षा चांगलं होतं, असा हवाला ते देतात.

दिल्लीतील लोकसभेच्या दिशेने आगेकूच करणा-या मोदींच्या मार्गात प्रमुख अडसर आहे तो सत्ताधारी काँग्रेसचाच. पीएमपदाची स्वप्ने पाहणा-या मोदींना त्यामुळंच काँग्रेसवर हल्ला चढवणं क्रमप्राप्त आहे, असे मोदींच्या टीकेवरून दिसून येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014, 11:00


comments powered by Disqus