Last Updated: Monday, September 10, 2012, 17:24
www.24taas.com, न्यू यॉर्कसोनिया गांधी यांचा कँसरशी सुरू असलेल्या लढ्यात सोनिया गांधी विजयी झाल्या आहेत. त्यांना झालेला कँसर संपूर्णतः बरा झाला आहे. कँसरवरील उपचारांसाठी सोनिया गांधी अमेरिकेमध्ये गेल्या होत्या. आता १२ सप्टेंबर रोजी सोनिया पुन्हा भारतात येतील.
सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला सोनिया परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. विधानसभेत चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अशा अचनाक परदेशी निघून गेल्यामुळे चर्चा सुरू झाली होती. सोनिया गांधी आपल्या नेहमीच्या चेक-अपसाठी न्यू यॉर्कला गेल्याचं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं होतं. सोनिया गांधींच्या परदेश दौऱ्याचं कारण गुप्त ठेवण्यात आलं होतं. मात्र सोनिया गांधी न्यू यॉर्क येथे स्लो अन केट्टरिंग कँसर केंद्रात उपचार कँसरवर उपचार घेण्यासाठी गेल्या होत्या.
First Published: Monday, September 10, 2012, 17:24