सोनिया गांधीचा फेसबुकवर ‘असभ्य’ फोटो , SONIA GANDHI PHOTO ON FACEBOOK

सोनिया गांधीचा फेसबुकवर ‘असभ्य’ फोटो

सोनिया गांधीचा फेसबुकवर ‘असभ्य’ फोटो
www.24taas.com, झी मीडिया, जालंधर

फेसबुकवर नेत्यांचे फोटो असणं काही विशेष बाब नाही. त्यात फोटोंना एडिट करुन नेत्यांची थट्टा करणारे तर बरेच असतात. असाच काहीसा प्रकार एका भाजप नेत्याने केलाय. त्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक विकृत फोटो फेसबुकवर अपलोड केलाय.

भाजपच्या या कार्यकर्त्याचे नाव आहे संदीप भल्ला. या भल्लाने त्याच्या फेसबुकच्या अकाउंटवर सोनिया गांधी यांचा एक विकृत फोटो टाकलाय. यासंबधी जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता संजय सेहगल यांनी संदीप भल्ला यांच्याविरोधात सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केलीय.

आम्ही महिलांचा आदर करतो आणि अशा प्रकारचे कृत्य होता कामा नये. ज्याने कोणी हे कृत्य केलयं, त्याने भाजप आणि भारतीय संस्कृतीविरोधात काम केलेल आहे. आमचा पक्ष महिलांचा आदर करतो. अशा प्रकारची कृत्ये सहन केली जाणार नाहीत. तो जर पक्षाचा सदस्य असेल त्याच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल, या प्रकरणासंबधी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष कमल शर्मा असे म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 2, 2013, 11:32


comments powered by Disqus