Last Updated: Friday, March 8, 2013, 12:37
www.24taas.com,नवी दिल्ली काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.सोनिया गांधी देशातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय नेत्या आहेत.
आता त्या देशातल्या सगळ्यात लोकप्रिय महिला बनल्यात. एसोचेम आणि झी बिझनेसनं देशातल्या ११ लहान-मोठ्या शहरात 2000 व्यक्तींचा सर्वे घेतला.या सर्वेमध्ये सोनिया लोकप्रिय महिला असल्याचं समोर आलंय.
या सर्व्हेत सोनिया यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर, पेप्सीकोच्या अध्यक्षा,सीईओ इंद्रा नूई आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना मागं टाकलंय.
First Published: Friday, March 8, 2013, 12:25