सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद, Sonia is the entire country`s mother: Union Minister Salm

सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद

सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्या आई नसून संपूर्ण देशाची आई आहेत, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी आज करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहे. पराभवाचे खापर पक्षातील नेते एकमेकांवर फोडताना दिसू लागले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना दुसरयांदा पंतप्रधान करून, काँग्रेसने चूक केली आहे, वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केले होते. यापुढेही जाऊन खुर्शिद यांनी आपल्या हुजरेगिरीचा नमुना दाखवत सांगितले की, सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्याच नाही तर आमच्यासह संपूर्ण देशाची आई आहेत.

खुर्शिद यांनीची ही अशा प्रकारे वक्तव्य करण्यीच पहिली वेळ नाही यापूर्वीही त्यांनी बाटला चकमकीवेळी ठार झालेल्या दहशतवाद्यांसाठी सोनिया गांधी यांनी अश्रू गाळल्याचे म्हटले होते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013, 18:50


comments powered by Disqus