Last Updated: Saturday, April 6, 2013, 12:19
www.24taas.com, नवी दिल्ली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अजमल कसाब आणि अफजल गुरु यांना फाशीवर चढवल्यानंतर आणखी पाच जणांची फाशीची शिक्षा कायम करून द्या याचिका निकालात काढायचं एक रेकॉर्डच बनवलंय. यामध्ये आणखी एका रेकॉर्डचा समावेश होणार आहे. तो म्हणजे मुखर्जी यांनी दिलेल्या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच एक महिला फासावर जाणार आहे.
ही महिला म्हणजे हरियाणामधील बहुचर्चित रेलूराम पुनिया परिवार हत्याकांडात दोषी ठरलेली सोनिया... सोनिया हिच्यासोबत तिचा पती संजिव याचाही दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावलाय. सोनियानं आपल्या कुटुंबातील आठ लोकांची हत्या केली होती. यामध्ये आई वडिलांचादेखील समावेश आहे. फाशी देण्यांची तारीख हिसारच्या सत्र न्यांयालयाकडून निश्चित करण्यात येणार आहे.
सोनिया आणि संजीव सध्यान अंबाला येथील तुरूंगात आहेत. हरियाणाचे माजी आमदार रेलूराम पुनियांसहित त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांची हत्या २३ ऑगस्ट २००१ रोजी करण्यात आली होती.
First Published: Saturday, April 6, 2013, 12:19