सोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप, Soon a mobile app to check gold quality

सोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप

सोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी. तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध आहे याबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर आता सरकारनं त्यावर उपाय शोधलाय. आणि एखाद्या वेळेस दागिना चोरीला गेला तर तुम्हीच मालक आहात हेही पटवून देणं आता सोप्प होणार आहे. यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले जाणार आहे.

भारतीयांना सोनं खरेदीची प्रचंड आवड आहे. सणवार असो की लग्नसराई किंवा गुरुपुष्यअमृतयोग... सोन्याची खरेदी जोरात असते. गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिलं जातं.. पण आता सरकार सोनेखरेदीवर नजर ठेवण्यासाठी एक खास योजना राबवणार आहे.

सोन्याच्या हॉलमार्क दागिन्यांवर आता असेल युनिक नंबर. या युनिक नंबरमुळे सरकारला कळेल. दागिना वापरण्यासाठी किती शुद्ध सोने वापरले गेले आहे.. या दागिन्याचा मालक कोण आहे..यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले जाणार आहे... दागिन्याचा युनिक नंबर या अॅप मध्ये टाकला की सोन्याची शुद्धता आणि मालकी यांची माहिती मोबाईलवर झळकू लागेल...
रियल इस्टेट नंतर काळा पैसा सोन्यात गुंतवला जातो. लहान गावापासून ते मोठया शहरांपर्यंत सगळीकडेच सोने खरेदीसाठी झुंबड उडत असते..बहुतेक वेळा ही खरेदी रोखीत केली जाते.

पाच लाखांपर्यंतच्या खरेदीवर पॅन नंबर विचारला जात नाही. सोन्याची सत्तर टक्के विक्री छोटया शहरांमध्ये होते बहुतेक विक्रेत्यांकडे आणि खरेदीदारांकडे पॅन नंबर नसतो त्यामुळं सोने खरेदी विक्रीवर नजर ठेवणे सरकारले कठिण जाते...त्यामुळे दागिन्यांना युनिक नंबर मिळाला तर सरकारी यंत्रणांना नजर ठेवणे सोपे जाईल...पण सोने विक्रेत्यांना मात्र डोकेदुखी वाढण्याची भिती वाटतेय.

सोन्यातली वाढती गुंतवणूक ही सरकारसाठी एक चिंतेची बाब आहे. आयातीसाठी परकीय चलन वापरावे लागत असल्यानं अर्थव्यवस्थेवर ताण येतो.. तर दुसरीकडे सोन्यात होणा-या गुंतवणूकीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला काही फायदा होत नाही मात्र काळ्या पैशात वाढ होते. काहीही असो...पण भारतीयांचं सोन्याचं आकर्षण कमी होईल अशी काही चिन्ह नाहीत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 22:24


comments powered by Disqus